पदवी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व सर्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम २१ जानेवारी रोजी

वेंगुर्ला,दि.१८ जानेवारी

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे आदर्श पत्रकार, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता, साहित्यिक, आदर्श ग्रंथालय व आदर्श ग्रंथालय कर्मचारी आदी पुरस्कारांचे वितरण तसेच वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, बालवाडी स्पर्धा, गायन स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, सुदत्त रामचंद्र व मंदाकिनी किनळेकर स्मृती पारितोषिक, चित्रकला स्पर्धा व खर्डेकर महाविद्यालयातील पदवी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व सर्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. कुडाळ हायस्कूलचे माजी प्राचार्य काशिनाथ सामंत यांच्या हस्ते होणार आहे.