मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम

 वेंगुर्ला,दि.१८ जानेवारी

अणसूर पाल हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिलेल्या निर्देशानुसार १४ ते २८ जानेवारी २०२४ मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील कविवर्य मंगेश पाडगावकर वाचन कट्ट्यावर करण्यात आले.

यावेळी विजय ठाकर यांनी मराठी भाषेची उत्पत्ती, थोरवी-महती, मराठी भाषेतील समृद्ध साहित्य परंपरा – लेखक, कवी, इतिहासकार, नाटककार आदींची माहिती दिली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या नाट्य उता-याचे वाचन केले. शिक्षिका चारुता परब यांनी मकरसंक्रांत सणाविषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक अक्षता पेडणेकर, सुधीर पालकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय मुख्यमंत्री आदर्श गावडे, विद्यार्थीनी प्रमुख पुर्वा आमडोसकर, अस्मिता गावडे, प्राची गावडे यांनी परिश्रम घेतले.