पोईप येथे क्रीडा महोत्सवाचे आयोजन

मालवण,दि.५ मे

मालवण तालुक्यातील पोईप येरम म्हसकरवाडी येथील तरुण सहकार मंडळातर्फे दि. ९ ते १० मे या कालावधीत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ दि. ९ रोजी सकाळी ९ वा. पोईप धरण मैदान येथे होणार आहे. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, दिंडी भजन स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहेत. तर दि. १३ मे रोजी दुपारी २ वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल येरम ८२७५६४९२६२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.