मानसीश्वर पर्यटन संस्थेच्या अध्यक्षपदी सुशिल चमणकर

वेंगुर्ला,दि.१८ जानेवारी

उभादांडा येथील श्री देव मानसीश्वर पर्यटन सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सुशील चमणकर तर सचिवपदी गणपत केळूसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

श्री देव मानसीश्वर पर्यटन सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक वेंगुर्ला निबंधक अधिकारी प्रशांत साळगांवकर व रुपेश मोरे यांच्या देखरेखीखाली पार पाडली. यात संस्थेच्या अध्यक्षपदी सुशील अर्जुन चमणकर, सचिवपदी गणपत केळूसकर, उपाध्यक्षपदी प्रकाश मोटे तर खजिनदारपदी सत्यविजय मयेकर यांचा समावेश आहे. यावेळी संस्थेचे संचालक विजय वराडकर, नारायण केळूसकर, वल्लभ शिरगांवकर, उत्तम आरावंदेकर, चैतन्य भूते, मनोरंजना टाककर व हर्मायणी खराडे उपस्थित होते.