मालवण,दि.५ मे
मेढेकरी विकास मंडळ, मेढा-मालवण यांच्यावतीने दोन पिंपळ महापुरुष मंदिर येथे दि. १० मे रोजी दुपारी ३ वाजता सत्यनाराणाची महापूजा आयोजित केली आहे. रात्री ९ वाजता भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या तीन क्रमांकांना पाच हजार, तीन हजार, दोन हजार व उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात येणार आहेत. नावनोंदणीसाठी उन्मेश मसुरकर ९७३००७९५३० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.