कळसुलकर महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिन

वेंगुर्ला,दि.१८ जानेवारी

स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन हा देशभरात राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने १२ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील कळसुलकर महाविद्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.

प्रमुख वक्ते अमित नाईक यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले. विराय सातवळेकर यांनी युद्ध कौशल्याचे प्रात्यक्षिक सादर केले. माजी विद्यार्थी ऋग्वेद कशाळीकर याने स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारीत काव्याचे वाचन केले. यावेळी प्राचार्य मानकर, श्री.पाटील, आलेखा नाईक, श्री.भुरे, संस्था सदस्य अण्णा म्हापसेकर, निखिल गावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. कोलगांवकर यांनी तर आभार सोनाली परब यांनी मानले.