तुळस येथे वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन

वेंगुर्ला,दि.५ मे

श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक विशाल परब यांच्यावतीने देण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन आणि विद्यालयाच्यावतीने विशाल परब यांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला.

यावेळी तुळस माजी सरपंच शंकर घारे, विजय रेडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक तुळसकर, पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी विशाल परब यांनी मुलांच्या उपस्थितीत वॉटर प्युरिफायरचे उद्घाटन केले. प्रभारी मुख्याध्यापक संदिप तुळसकर यांच्या हस्ते विशाल परब यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. येत्या काळात विद्यालयाची वाटचाल उज्ज्वल व्हावी, यासाठी विशाल परब यनी विद्यालयास आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भावी काळात कोणतीही मदत लागल्यास आवर्जून सांगावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन श्री.घोडे-पाटील यांनी केले तर आभार तुळसकर यांनी मानले.