देवगड,दि.१८ जानेवारी
प्रत्येक माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी व भक्तांच्या नवसाला पावणारी, जागणारी, असा नावलौकिक असलेल्या देवगड तालुक्यातील
शिरगांव गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह रविवारी २१ जानेवारी २०२४ ला पारंपरिक
रीतीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
देवगड – निपाणी राज्यमार्गावर शिरगांव हे गाव आहे. या गावाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कलात्मक वारसा लाभलेला आहे.
या गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीचे सुरेख असे आकर्षक देवालय आहे. या देवालयाचा परिसर अतिशय प्रसन्न आणि आल्हादायक आहे. या
मंदिराचे सुशोभीकरण आणि पावित्र्य बघून येणाऱ्या भाविकांचे मन तृप्त होते. दरवर्षी पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशी दिवशी या देवालयात
थाटामाटात साजरा होणाऱ्या हरिनाम सप्ताहास जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक उपस्थित रहातात. तसेच नोकरी,
व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी, माहेरवाशिणी, भाविक कृपाशीर्वादासाठी याठिकाणी आवर्जून येतात. जिल्हयातील व
जिल्ह्याबाहेरील व्यापारी, महिला बचतगट छोटेखानी दुकाने थाटतात. तसेच या उत्सवादिवशी मंदिरपरिसरत आकर्षक विद्युत रोषणाई केली
जाते.
या हरिनाम सप्ताहास जास्तीतजास्त भाविकांनी, भजनी मंडळांनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री पावणा देवी
देवालय विश्वस्त मंडळ, बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग शिरगांव गावचे जागृत ग्रामदैवत श्री पावणाई देवीचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह...