केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ६० ते ७० हजार मताधिक्य मिळेल-माजी नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी दि.६ मे 
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ६० ते ७० हजार मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक अँड परिमल नाईक, उदय नाईक, मंदार नार्वेकर उपस्थित होते.
संजू परब म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मेहनत घेतली. या मतदारसंघात अडीच लाख मताधिक्य मिळवून विजयी होणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ६० ते ७० हजार मताधिक्य मिळेल. भाजप आणि नारायण राणे यांच्या प्रेमापोटी मतदान होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तीन हजार कोटी रुपये विकासासाठी दिले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. विरोधक उगाच काहीतरी बरळत आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी सर्वच पदाधिकारी, महायुतीचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर, माजी आमदार राजन तेली यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राणे यांच्या विजयासाठी झटले आहे.
संजू परब म्हणाले, काल भर दुपारी उन्हात झालेल्या सभेत गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि राणे कोकणचे भाग्यविधाते म्हणून मतदान होणार आहे. दिपक केसरकर यांनी चांगल्या प्रकारे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सांभाळून राणे यांच्या विजयासाठी मेहनत घेतली.
अँड परिमल नाईक, सावंतवाडी शहरातील गांधी चौकात सभा घेतल्यानंतर विजयश्री मिळते असा विश्वास मंत्री दिपक केसरकर यांचा आहे. मात्र आम्ही मतदार संघात फिरत असताना राणे यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४०० पार नारा यश प्राप्त करेल. विरोधकांकडे पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत. फक्त शिवीगाळ एवढंच विरोधकांनी काम केले.