श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त हळवल श्रीराम मंदिरात धार्मिक कार्यक्रम

प्राणजीवन सहयोग संस्थाध्यक्ष संदीप चौकेकर यांचे आयोजन

कणकवली दि.१८ जानेवारी(भगवान लोके)

अयोध्येत 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनानिमित्त हळवल येथील श्रीराम मंदिरात प्राणजीवन सहयोग संस्थाध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या वतीने , श्रीराम सेवा मंडळ हळवल मुंबई च्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेकडो वर्षांनी अयोध्येत प्रभूश्रीराम यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे.सर्व हिंदू धर्मियांसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने हळवल येथील श्रीराम मंदिरात 22 जून रोजी प्रभू श्रीरामाचा जयघोष करत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे संस्थाध्यक्ष संदीप चौकेकर यांनी सांगितले. सकाळी 9 वाजता अभिषेक करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता हरिपाठ पठण करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. रात्री 8 वाजता सुश्राव्य भजन सादर होणार असून रात्री 9 वाजता कीर्तन होणार आहे. कार्यक्रम आयोजनासाठी प्राणजीवन सहयोग संस्थेचे स्वप्नील पुजारे, सचिन धुरी, श्रीकृष्ण यादव, प्रशांत गावडे, अनिप सावंत, शुभम सावंत, चकोर सावंत, सिद्धेश परब, विजय परब, अरुण चौकेकर मेहनत घेत आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था आणि श्रीराम सेवा मंडळ हळवल मुंबई च्या वतीने करण्यात आले आहे.