विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर ६०० पोलिस तैनात
सावंतवाडी दि.६ मे
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर ६०० पोलिस तैनात करण्यात आले असून आज सकाळीच सर्व बुथवर मतदान यंत्रे व बुथ प्रमुख रवाना झाले. प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी हेमंत निकम यांनी याबाबत आढावा घेतला.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून सावंतवाडी मतदारसंघाकडे पाहिजे जात आहे.या मतदारसंघात प्रामुख्याने महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशीच लढत होणार असून या उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे.तर २ लाख २४ हजार ४२१ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजवणार आहेत.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.तसेच मतदान केंद्रावर ६०० पोलिसांचे विशेष लक्ष असणार असून प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण मतदारसंघ म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते.या मतदारसंघात सावंतवाडी ,दोडामार्ग व वेगुर्ले हे तीन तालुके येतात.या तालुक्याचे मुख्य निवडणूक केंद्र सावंतवाडीत आहे.येथूनच प्रत्येक तालुक्यात केंद्रावरील अधिकारी कर्मचारी रवाना झाले असून यात दोन पोलिस व कर्मचारी असे हे पथक मतपेटया घेऊन सोमवारी सकाळपासून रवाना झाले आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख २४ हजार ४२१ मतदार आहेत.यात महिला मतदारांची संख्या ही १,१२,६४८ तर पुरूष मतदार ११२१७९ एवढी आहे.तर या मतदार संघात मतदान केंद्र ३०८ एवढी असून विशेष मतदान केंद्र ४ आहेत यात सावंतवाडी २ ,वेगुर्ले १ व दोडामार्ग १ अशी मिळून ही केंद्र आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ हजार ५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून २५ अधिकारी व २०० कार्यालयीन कर्मचारी असणार आहेत.तर प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
या शिवाय ४२ सेक्टर अधिकारी ४० मायक्रो ऑब्झरवर असणार असून ४० बसेस ची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या शिवाय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्र तसेच परदाशीन केंद्र अंपगासाठी मतदान केंद्र युवा मतदारासाठी केंद्र अशी वेगवेगळी केंद्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आली असून यात वेगुर्ले येथे सखी मतदान केंद्र तर दोडामार्ग येथे परदाशीन सावंतवाडी बाहेरचावाडा येथे युवा व अपंगांसाठी माडखोल येथील मतदान केंद्र करण्यात आले आहेत.
या शिवाय सावंतवाडी मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली जावी म्हणून पोलिसांकडून ही विशेष खबरदारी घेण्यात आली असून ६०० पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
यंदा ८५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या ५२६ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्यात आले त्यासाठी ४५ टिम नेमलेल्या होत्या. यावेळी ५२६ पैकी ४८८ जेष्ठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मधील इतर मयत किंवा स्थलांतरित झाले आहेत. तसेच पोस्टल ९०० पैकी ८४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. हे मतदान उत्स्फूर्त झाले आहे, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले.