स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सावंतवाडी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले

सावंतवाडी,दि.१८ जानेवारी
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यामध्ये सर्व धार्मिक स्थळे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची सखोल स्वच्छता करावयाची होती. यानुसार सावंतवाडी शहरातील दैवज्ञ गणपती मंदिर, नरसोबा मंदिर, विठ्ठल मंदिर बाजारपेठ, विठ्ठल मंदिर भटवाडी, भवानी मंदिर गरड, श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर, ईस्वटी महापुरुष मंदिर सबनीसवाडा, हनुमान मंदिर कोर्ट नजिक येथे आज स्वच्छता मोहीम राबविणेत आल्या या वेळी मंदिर परिसर व आजूबाजूच्या परिसराची महिला बचत गट, नगरपरिषद सफाई . मित्र, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला तसेच लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, समता मंडळ, डॉक्टर्स फॅटरनिटी क्लब यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. शहरातले मंदिरानजीकचे नागरिक ही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
तसेच सफाइमित्र यांनी विठ्ठल मंदिर व श्री देव उपरलकर येथे निर्माल्य पासून कंपोस्ट तयार करुन “3R” तत्वांचे पालन करणेसाठी व टाकाऊ पासून संपती निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले.

तसेच मुख्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सखोल स्वच्छता मोहीम (Deep Cleaning Campaign) राबविणेबाबत निर्देश दिलेले होते. सदर प्राप्त निर्देशानुसार आज सावंतवाडी शहरात हेल्थ फार्म ते शिल्पग्राम ह्या परिसरात सखोल स्वच्छता मोहीम सकाळी वाजता घेण्यात आली. सदर मोहिमेअंतर्गत हेल्थ फार्म व शिल्पग्राम परिसरातील सर्व रस्ते, नाले, फूटपाथ या ठिकाणी साफसफाई करण्यात आली. सदर मोहिमेत सावंतवाडी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी व सफाई मित्र सहभागी झाले होते. तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी यांनी ह्या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तसेच शिल्पग्राम परिसरातील रहिवाशी देखील ह्या मोहिमेत सहभागी झाले होते.

ही मोहीम यशस्वी करणेसाठी प्रशासकीय अधिकारी श्री. वैभव अंधारे, श्री. दीपक म्हापसेकर, सर्व अधिकारी कर्मचारी व सफाइमित्र यांनी विशेष श्रम घेतले अशाप्रकारे उत्स्फूर्तेने स्वच्छता मोहीम राबविलेने शहरात स्वच्छताविषयक जनजागृती व प्रत्यक्ष कार्यातून संदेश दिल्याबद्दल मा. मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे व मा. प्रशासक श्री. प्रशांत पानवेकर यांनी सर्वाचे सहकार्याबद्दल आभार मानले.