लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अनुकूल वातावरण-माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी दि.६ मे
लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अनुकूल वातावरण असून महायुतीचे सर्वच पक्ष एकत्रित प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे मोठे मताधिक्य मिळेल. सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा माजी आमदार राजन तेली यांनी दिली.

भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले, भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळवून देणारे वातावरण आहे. हिंदू धर्म, राम मंदिर, ३७० कलम,त्रिपल तलाक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय जनतेला भावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कणखर नेतृत्व असून सैन्याचे मनोबल वाढविणारे ठरले आहे. मतदानाचा टक्का वाढेल. यावेळी ७० टक्के मतदान होणार आहे असे वातावरण आहे. मागच्या वेळेपेक्षा आता वातावरण निर्माण झाले असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व रामदास आठवले आरपीआय पक्ष एकत्रित प्रचारार्थ उतरले आहेत.
तेली म्हणाले, उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची धडाडी, निर्णय घेण्याची क्षमता आणि आतापर्यंत केलेल्या कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे म्हणून ओळखले जातात. कोकणचे नेतृत्व नारायण राणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने मतरूपी आशिर्वाद द्यावे. सर्व निवडणुका भाजपचे वर्चस्व आहे आज सर्वच एकत्रित आले आहेत. तसेच सर्वांगीण विकासामुळे जनता राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील.