पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली….
देवगड ,दि.६ मे
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभुमीवर देवगड तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान मंगळवार ७ मे रोजी होत असून या पार्श्वभुमीवर देवगड तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३६ मतदान केंद्रावर पोलिस कर्मचारी व होमगार्ड मिळून एकुण २७२ कर्मचारी तसेच ९ अधिकारी व १४ गस्तीसाठी कर्मचारी असे एकूण २९५ पोलिस कर्मचारी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोंदीया जिल्ह्यातून एसआरपीचे ४ अधिकारी व ८३ कर्मचाऱ्यांचे पथक देवगडमध्ये सोमवारी दाखल झाले.