जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने देवगड आगाराकडे अक्षम्य दुर्लक्ष…

एसटीचे स्पेअर पार्ट वेळीच उपलब्ध होत नसल्यामुळे आगार व्यवस्थापक निलेश लाड हतबल…

आगारातील बहुतांशी एसटी गाड्या नादुरुस्त…

देवगड,दि.१८ जानेवारी
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने देवगड आगाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून या विभागीय कार्यालयातून आवश्यक असणारे एसटीचे स्पेअर पार्ट वेळीच उपलब्ध होत नसल्यामुळे आगार व्यवस्थापक निलेश लाड हतबल होत असून देवगड आगारातील बहुतांशी एसटी गाड्या या
नादुरुस्त स्थितीत देवगड आगारात उभ्या आहेत याचा परिणाम देवगड आगारातून सुटणाऱ्या नियमित प्रवासी फेऱ्यांवर होणार असून लांब पल्ल्यांच्या प्रवासी फेऱ्यांबरोबर देवगड तालुक्यातील शालेय ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या ह्या विलंबाने सुटणे प्रसंगी त्या रद्द करणे असे वाढते प्रकार होण्याची शक्यता वाढली आहे .
सद्यस्थितीत पाहता देवगड आगारात सुमारे सहा ते सात एसटी गाड्या या नादुरुस्तीत उभ्या असून त्यांना आवश्यक असणारे स्पेअर पार्ट हे विभागीय कार्यालयाकडून वेळीच उपलब्ध झालेले नाहीत. गुरुवारी सकाळी विभागीय कार्यालयाकडे गेलेली एसटी गाडी ही साहित्य घेऊन गेलेली असतानाही त्या गाडीतील साहित्य उतरुन घेतले गेले नाही प्रसंगी उभ्या असलेल्या नादुरुस्त गाड्यांकरिता आवश्यक असलेले स्पेअर पार्ट व अन्य साधनसामग्री या एसटी मधून देवगड आगाराकडे पाठविण्यात आली नाही .त्यामुळे देवगड आगारातील नादुरुस्त असलेल्या गाड्या ह्या दुरुस्त करण्याकरता आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध न झाल्यामुळे त्या नादुरुस्त स्थितीत देवगड आगारात उभ्या आहेत. व याचाच परिणाम शुक्रवार पासून सुटणाऱ्या कित्येक प्रवासी फेऱ्या ह्या प्रसंगी विलंबाने सुटतील त्याचबरोबर त्या रद्द कराव्या लागतील शुक्रवार हा देवगड येथील महत्त्वाचा आठवडा बाजार असून या आठवड्या बाजाराच्या अनुषंगाने देवगड बस स्थानकावर प्रचंड प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते त्यातच महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी असतात आणि यांना दुरुस्त गाड्यांमुळे देवगड आगारातून नियमित सुटणाऱ्या प्रवासी फेऱ्या ह्या निश्चितपणे विलंबाने सुटणार असून विद्यार्थी व प्रवासी यांचा खोळंबा निश्चितपणे होणार आहे याकडे विभागीय कार्यालयाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगाराचे वरिष्ठ अधिकारी यांनीही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत देवगड वारंवार कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे चर्चेत येत असताना त्याचबरोबर देवगड आगाराची लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यांना मिळणारे भारमान हे अपेक्षित असतानाही देवगड आगाराकडे वारंवार विभागीय कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जाते व अन्याय केला जातो अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे देवगड आगारात सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या प्रवासी एसटी गाड्या ह्या जुन्या जीवन झालेला असून वारंवार त्याची डागडुजी करून त्याची रंगरंगोटी करून देवगड आगाराकडे सुपुत्र करण्यात येतात परंतु लांब पल्या करता आवश्यक असणाऱ्या गाड्या देखील या सुस्थितीतील उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना रद्द होणे प्रसंगी प्रवासात अशा प्रवास फेऱ्याना विलंब होणे अशा घटना वारंवार घडत आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नावलौकिक प्राप्त केलेला देवगड आगार हा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.