सिंधुदुर्गचा दशावतार प्रथमच विदर्भच्या दौऱ्यावर

मालवण,दि.१८ जानेवारी

सिंधुदुर्गचा दशावतार १५ ख्यातनाम दशावतारी कलावंतांसह प्रथमच विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहे. दि. २० जानेवारी रोजी श्री जैताई मंदिर, वणी येथे रामकथेवरील लोकनाट्य हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

यात दशावतार मध्ये सुहास माळकर, सतीश केळुसकर, बाळू कोचरेकर, गिरीधर गावकर, आनंद कोरगावकर, केशव खांबल, नटवर्य बाबली आकेरकर, गोट्या चव्हाण यांचा सहभाग आहे. संगीत साथ हार्मोनियम अनंत घाडीगावकर, पखवाज बाळू राणे, तालरक्षक संदेश परब यांची आहे. या दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ, कोळंब भटवाडीचे मालक सुहास उर्फ मामा माळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.