तानाजी पांगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
आचरा ,दि.७ मे(अर्जुन बापर्डेकर)
ज्येष्ठ नागरीक सेवा संघा तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंग कर्मी आणि माजी पोलीस पाटील तानाजी पांगे यांना देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेह मेळाव्यात हा पुरस्कार वितरित करण्यात आला यावेळी रिजारुओ पिंटो यांनी सादर केलेल्या मालवणी कवितांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे वार्षिक स्नेहमेळावा लौकिक सांस्कृतिक भवन येथे अशोक कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रुजारिओ पिंटो, सल्लागार बाबाजी भिसळे उपाध्यक्ष सुरेश ठाकूर सचिव जाकारीएस फर्नांडिस महिला आघाडी प्रमुख मनाली फाटक यांसह अन्य पदाधिकारी बहुसंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या मेळाव्याची सुरुवात प्रार्थनेने झाली नजीकच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांना यावेळी गौरविण्यात आले ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आसरा पंचक्रोशीच्या वतीने दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो.यात पहिल्या वर्षी चांगले सामाजिक कार्य करणाऱ्या जेष्ठ नागरिकाला, दुसऱ्या वर्षी चांगले सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेला तर तिसऱ्या वर्षी तरुणाला जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षी हा पुरस्कार गावातील रंगकर्मी तानाजी पांगे या ज्येष्ठ व्यक्तींना नाट्यक्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला .