भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून देणार तसेच शहरात आघाडीवर राहू-मंत्री दिपक केसरकर

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात भटवाडी केंद्रावर भेट

सावंतवाडी दि.७ मे 
सावंतवाडी शहरासह मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मताधिक्य मिळवून देणार आहोत. ५० ते ७० हजार असेल तसेच शहरात आघाडीवर राहू असा विश्वास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केला.

शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात भटवाडी केंद्रावर भेट दिली तेव्हा ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, संजय पेडणेकर, रवी नाईक, अशोक पेडणेकर, एकनाथ पेडणेकर, बंड्या केरकर, शाम हळदणकर,सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.