चिंदर देऊळवाडी येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण,दि.१८ जानेवारी
अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा व उदघाटन सोहळा या निमित्ताने दिनांक २२ जानेवारी रोजी चिंदर देऊळवाडी येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्री देव रामेश्वर अभिषेक, ९ वाजता श्री राम महापूजा व अभिषेक, १० ते १२ वाजेपर्यंत होम हवन व रामनाम जप, १२ वाजता नैवेद्य व अयोध्येतील श्रीराम मंदिर उदघाटन सोहळा थेट प्रक्षेपण, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता गावातील विविध भजन मंडळाची भजने, सायंकाळी ६ वाजता हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ८ वाजता श्री. धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच श्रीराम यांच्या गाण्यावर भव्य खुली एकेरी व समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकेरी नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक ५००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ३००० रुपये व चषक, तृतीय क्रमांक २००० रुपये व चषक तर उत्तेजनार्थ १००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर समूहनृत्य स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १०,००० रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ७,००० रुपये व चषक, तृतीय क्रमांक ५,००० रुपये व चषक तर उत्तेजनार्थ २,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन चिंदर ग्रामस्थ, बारापाच मानकरी आणि रामभक्त यांनी केले आहे.