भाजपचे विधानसभा समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी आज मतदारसंघातील प्रत्येक बुथवर जाऊन आढावा घेतला

सावंतवाडी दि.७ मे
लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विजयासाठी भाजप महायुतीचे कार्यकर्ते झटले असून त्यांना मोठे मताधिक्य सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मिळणार आहे असे माजी आमदार राजन तेली यांनी बोलताना सांगितले.
या पार्श्वभूमीवर भाजपचे विधानसभा समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी आज मतदारसंघातील प्रत्येक बुथवर जाऊन आढावा घेतला यानंतर त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे बोलताना सांगितले.