अयोध्या,दि.१८ जानेवारी
अयोध्या – येथील भगवान श्रीराम मंदिराच्या गर्भगृहमध्ये श्रीराम शास्त्रोक्त पद्धती व पुजा पाठद्वारे विराजमान झाले आहेत. गुरूवारी सायंकाळी शुभकार्य संपन्न झाले. जेव्हा रामललाची प्रतिमा गर्भगृहमध्ये स्थापित करण्यात आली तेव्हा शतकानंतर रामलला आपल्या जन्मस्थावर विराजमान झाले आहेत. आता २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा लाखों श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत होईल.
प्राणप्रतिष्ठेनंतर श्रीरामाचे पावन दर्शन होईल. आज गुरूवार रामललाच्या मूर्तीला आसनाधिष्ठ करण्यासाठी ४ तासांचा कालावधी लागला. मंत्रोच्चार आणि पूजन विधीसोबत भगवान रामाचे स्थापित आसन पावित्र्यपूर्ण राखून श्रीराम मूर्ती विराजमान झाली. मूर्तीकार योगीराज आणि अनेक संत यावेळी उपस्थित होते. आज गुरूवार गर्भगृहमध्ये मूर्ती स्थापित करताना ती पूर्ण पडद्याआड होती, आता विराजमान असून असंख्य फुलांच्या सुगंधात स्थापन करण्यात आली आहे.