मिठबाव येथे श्री देव लोके कुलस्वामी मंदीरात धार्मिक कार्यक्रम

१२ मे रोजी ब्राह्मण भोजन,१४ मे रोजी श्री‌ सत्यनारायण महापुजेचे आयोजन

कणकवली दि.८ मे(भगवान लोके)

अखिल लोके ज्ञाती मंडळ मिठबाव – मुंबई,लोके कुलस्वामी देवस्थान समिती मिठबाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे ब्राह्मण भोजन आणि श्री‌ सत्यनारायणाची महापुजा
देवगड तालुक्यातील मिठबाव वरचीवाडी श्री देव लोके कुलस्वामी मंदीरात आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त रविवार १२ मे रोजी ब्राह्मण भोजन , १४ मे रोजी श्री सत्यनारायण महापुजा होणार आहे.तरी आपण भाऊबंद मंडळी व माहेरवासिनी नातेवाईक यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.