बांदा,दि .८ मे
वाफोली कुडेरानवाडी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या परप्रांतियाने कर्जबाजारीपणाला कंटाळून घराच्या पडवीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. महंमद इक्बाल मदार शेख (वय ४६, मूळ रा गुलबर्गा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला काही काळ ते पुणे व मुंबई येथे राहत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मासिक भिशीतून कर्जाची रक्कम उचल केली होती. ती फेडता न आल्याने व रक्कम भरण्यासाठी सतत तगादा लावल्याने ते काही दिवस मानसिक तणावात होते. ते आपल्या दुसऱ्या पत्नीसह वाफोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.
बांदा परिसरात ते फरशी बसविण्याचे काम करत होते. आज सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांना गळफास लावलेल्या स्थितीत पाहिले. त्यांनी याची कल्पना स्थानिकांना दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला. बांदा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
Home आपलं सिंधुदुर्ग वाफोली कुडेरानवाडी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या परप्रांतियाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या