भाजपा कार्यकर्त्यांकडून झाली होती मारहाण ;ओरोस शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दिली भेट
कणकवली दि.८ मे ( भगवान लोके)
लोकसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान संपल्यावर सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास कणकवली खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपसरपंच बाळा राऊत यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.या मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना तातडीने खारेपाटण प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र ते गंभीर जखमी असल्याने त्यांना ओरोस येथील शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले आहे. बाळा राऊत यांची खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन विचारपूस करून त्यांना धीर दिला. तसेच बाळा राऊत यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थकांची हीच दहशत संपविण्यासाठी शिवसेना लढा देत आहे,ते म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,हरकूळ सरपंच बंडू ठाकूर,सचिन आचरेकर आदी उपस्थित होते.