वेंगुर्ला रामेश्वर वर्धापनदिन १० रोजी

वेंगुर्ला,दि.९ मे

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचा ३५८वा वर्धापनदिन शुक्रवार दि.१० मे (अक्षय्य तृतीया) रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायंकाळी ७ वा. श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.