दोन गटात वाद टाळण्यासाठी पोलिसांचा ठेवला होता बंदोबस्त ; जमीन मालक आणि पायवाट जात असलेल्या लोकांमध्ये झालेला वाद…
कणकवली दि.१८ जानेवारी (भगवान लोके)
पारंपारिक वाटेवर विना परवाना कंपाऊड वॉलचे बांधकाम गुरुदास गोविंद कारेकर रा. सांगवे कनेडी बाजारपेठ हे करीत असल्याने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नोटिसा बजावल्या.त्यानंतर सुरु असलेले कुंपण बांधकाम थांबविण्यात आले आहे.दरम्यान, शिवसेना युवा तालुकाप्रमुख उत्तम लोके व पोलिसात चर्चा झाली. त्यानंतर बांधकाम हे बांधकाम थांबविण्यात आले.
सांगवे कनेडी येथील
महादेव पुंडलिक पवार वैगरे इतर ग्रामस्थांचा तक्रार अर्ज पोलीस व प्रशासनाकडे केला होता.त्यानुसार सांगवे गावातील कनेडी बाजार ते तांडा वस्ती पर्यंत जाणा-या पारंपारिक वाटेवर/रस्त्यावर विना परवाना कुंपण बांधकाम करीत असल्यामुळे पारंपारिक वाट/रस्ता बंद झाल्याबाबतची तक्रार होती,अशी तक्रार ग्रामपंचायत ने पोलिसात दिली होती.
जि. प. मालकीच्या जाळेचे कंपाऊंड यापूर्वीच चार फुट अंतर सोडून त्यावेळी बांधकाम केलेले आहे. परंतु आता आपण करीत असलेले बांधकाम अंतर न सोडता करीत असल्यामुळे पारंपारिक बाट बंद झालेली आहे. त्यामुळे शाळा व अंगणवाडी मुले व ग्रामस्थांची गैरसोय झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी गुरुदास गोविंद कारेकर यांनी आपली बिनशेती मिळकत आहे.त्यामुळे कुंपण बांधकाम मी घालत आहे,असे पोलिसांना सांगितले. गुरुवारी सकाळी मोठा फौज फाटा दाखल झाला होता. काही दिवसापूर्वी दोन गटात वादंग झाले होते आणि त्यामुळे गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुन्हा हे काम सुरु करण्यासाठी श्री.कारेकर यांनी पुढाकार घेतला असता पोलिसांनी काम करणाऱ्या उत्तम लोके यांना काम थांबवा असे सांगितले.त्यामुळे तणाव निर्माण झाला होता, कारण उद्धव ठाकरे युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके हे या कुपनाचे काम करत होते. त्यांचे सहकाऱ्यांनी हे काम आम्ही करणारच अशी भूमिका घेतली होती.त्यामुळे राजकीय तणाव निर्माण होईल,म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आढाव, स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे संदीप भोसले, कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. शेळके मुंडे,देठे,मंगेश बावदाने यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता.