कोकण पदवीधर मतदार संघात 1 लाख 77 हजार 32 मतदार…

पुरवणी यादी जाहीर झाल्यावर मतदारांची संख्या दोन लाखाच्या घरात जाण्याची शक्यता

ठाणे,दि.९ मे

लोकसभा निवडणुकीनची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाने राज्यात कोकण व मुंबई पदवीधर आणि नाशिक व मुंबई शिक्षक मतदार संघातील रिक्त होणार्‍या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अवघ्या एका आठवड्यातच कोकण व मुंबई पदवीधर आणि नाशिक व मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आहे.यंदा कोकण पदवीधर मतदार संघात 1 लाख 77 हजार 32 मतदार असून पुरवणी यादी जाहीर झाल्यावर मतदारांची संख्या दोन लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मागील सन 2018च्या अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने निसटता विजय मिळविला. सन 2018 मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 72.35% मतदान झाले. कोकण पदवीधर मतदारसंघात मागील निवडणुकीत एकूण 75 हजार 439 मतदान झाले होते. मागील कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 8127 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 तर संजय मोरे यांना 24 हजार 704 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला तिसर्‍या क्रमांकावर राहिले. मात्र यंदा शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला भाजपाच्या महायुतीमध्ये असल्याने यंदा महाविकास आघाडीचा उमेदवार हा नवीन चेहरा असणार आहे ही जागा राष्ट्रवादी लढविणार का ? शिवसेना उद्धव ठाकरे हे अद्याप ठरलेले नाही. कोकण पदवीधर मतदार संघात विविध राजकीय पक्षाप्रमाने भारतीय पदवीधर प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष अमोल पवार यांनी कोकण आणि मुंबई पदवीधर मतदार नोंदणीसाठी मतदार नोंदणीची मोहीम राबिवली होती. त्याला प्रचंड यश मिळाले.

यंदा 1 जानेवारी 2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 77 हजार 32 मतदार आहेत यामध्ये सर्वाधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत ठाणे जिल्ह्यात एकूण 73 हजार 305 मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार 42 हजार 128 तर महिला मतदार 31 हजार 170 आहेत. रायगड जिल्ह्यात एकूण 45 हजार 338 मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार 25 हजार 688 तर महिला मतदार 19 हजार 607 आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 21 हजार 424 मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार 12 हजार 688 तर महिला मतदार 8 हजार 736 आहेत. पालघर जिल्ह्यात एकूण 19 हजार 481 मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार 11 हजार 531 तर महिला मतदार 7 हजार 949 आहेत. तसेच या विभागात सर्वाधिक कमी मतदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 हजार 481 मतदार आहेतयामध्ये पपुरुष मतदार हे 11 हजार 531 तर महिला मतदार 7 हजार 949 आहेत.या कोकण पदवीधर मतदार संघात 12 मे 2024 पर्यंत पदवीधर मतदारांना मतदार नोंदणी करता येणार आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान पुरवणी मतदार यादी जाहीर होणार असल्याने मतदारांची संख्या वाढणार आहे. मागील पदवीधर मतदारांच्या तुलनेत यंदा दुपटीने मतदार वाढण्याची शक्यता आहे.