असलदे गावठण येथे ११ मे रोजी सत्यनारायणाची महापुजा

वारकरी भजनांचा डबलबारी सामन्याचे आयोजन

कणकवली दि.९ मे(भगवान लोके)

असलदे गावठण येथे ग्रामविकास मंडळ, असलदे गावठण आणि ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्यावतीने ११ मे २०२४ रोजी श्री सत्यनारायण महापूजा सालाबादप्रमाणे सत्यधाम सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

त्यानिमित्त सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापुजा , दुपारी १२ वा. महाआरती , दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद, रात्रौ. ८ वा. स्थानिक भजन , रात्रौ. १० नंतर वारकरी भजनांचा डबलबारी सामना प्रासादिक भजन मंडळ, शिरवली गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, गडमठ
बुवा श्री. सागर मोहीते विरुद्ध श्री. राकेश शेलार यांच्यात होणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामविकास मंडळ, असलदे गावठण आणि ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्यावतीने करण्यात आले आहे.