हळवल येथील समीर गुरव यांचे निधन

कणकवली दि.१८ जानेवारी

हळवल येथील समीर सुभाष गुरव ( वय ३५ रा. हळवल गुरववाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अतिशय मनमिळावू स्वभाव म्हणून समीर परिचित होता. त्याच्या अकाली निधनाने हळवल गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई, बहीणी, भावोजी, भाची, काका काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. समीर हे आमदार वैभव नाईक यांच्या जवळ चालक म्हणून काम करत होते. तर हळवल माजी सरपंच दिपक गुरव यांचे ते बंधू होत.