शेंडी पागण्याच्या कारणावरुन सर्जेकोट येथील संतोष शेलटकर याच्यावर चाकुने वार

मालवण,दि.१० मे
शेंडी पागण्याच्या कारणावरुन सर्जेकोट येथील संतोष सत्यवान शेलटकर ( रा. कोळंब, खालचीवाडी) याच्यावर चाकुने वार करुन गंभीर दुखापत करणाऱ्या हर्षल रविंद्र पराडकर याला अटक करून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ऍड तुषार भणगे यांनी काम पाहिले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ दिवसांपूर्वी म्हणजेच दि १ मे २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष सत्यवान शेलटकर व त्याचा मित्र जगन्नाथ अंकुश सावजी हे सर्जेकोट जेटीवर आले असता संशयित हर्षल पराडकर याने शेंडी पागण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन हाताच्या थापटाने मारहाण करीत संतोष शेलटकर याच्या दंडावर, छातीवर व गालावर चाकूचे वार केले होते याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार मालवण पोलिसांनी हर्षल रविंद्र पराडकर याला अटक करून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे