सावंतवाडी दि१० मे
तळवडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रौप्य महोत्सवी २५ वा वर्धापन दिन सोहळा दि. १२ ते १५ मे पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त कुंभारवाडी तळवडे येथे वारकरी भजन व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे अशी कुंभार परिवार तळवडे यांच्या वतिने आवाहन करण्यात आले आहे.दि. १२ मे सकाळी ८ ते १२ : श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवर अभिषेक व श्री देव कुळकार होमहवन कार्यक्रम.दुपारी १२.०० ते १२.३०: आरती व उपस्थिताना महाप्रसाद.दुपारी ३.०० ते ४.०० : कुंभारवाडीतील महिला हळदीकुंकू समारंभ व फुगडी कार्यक्रम.सायं. ४.३० ते ५.३०: ज्ञानदेव तुकाराम सेवा मंडळ कामलेवीर ह.भ.प. विश्राम नागवेकर आणि मंडळी वारकरी हरिपाठ.सायं. ६.३० ते ९.०० वा. युवा किर्तनकार मुंबई विद्यापीठ सुवर्णपदक विजेते प्रा. ह.भ.प. नितेश कु. रायकर महाराज गडहिंग्लज यांचे वारकरी किर्तन.
तसेच दि. १३ मे पहाटे ४ ते ५ : काकाड आरती
सकाळी ९.०० ते १२.०० वारकरी भजन, महाआरती.दुपारी १२.३० ते २.०० : उपस्थितांना महाप्रसाद.संध्या ४.०० ते ५.०० : आषाढी सप्ताहात गेली २५ वर्षे अखंडपणे भजन सेवा ज्यांनी केली ते दत्त प्रासादिक पाटेकर भजन मंडळ तळवडे खेरवाडी यांचे सुश्राव्य भजन.संध्या ५.३० ते ६.३० : वारकरी हरीपाठ.संध्या ७.०० ते ९.०० वा. ह.भ.प. विनोद महाराज मुंबई (कणकवली) यांचे वारकरी किर्तन आयोजित करण्यात आले आहे.
तसेच दि. १४ मे पहाटे ४ ते ५: काकड आरती
सकाळी ९.०० ते १२.०० : वर्धापन दिन
ह.भ.प. विनोद महाराज मुंबई (कणकवली) यांचे वारकरी किर्तन.दुपारी २.०० वाजपर्यंत : महाप्रसाद.संध्या ३.०० ते ५.०० पर्यंत दिंडी सोहळा कार्यक्रम.संध्या ५.०० ते ६.०० : हरीपाठ.संध्या ६.०० ते ६.३० : दिपोत्सव.
संध्या ७.०० ते ९.०० ह.भ.प. रोहन महाराज पवार अकलुज सोलापुर यांचे वारकरी किर्तन होणार आहे.
तसेच दि. १५ मे रोजी पहाटे ४ ते ५ : काकड आरती ,सकाळी ९.०० ते १२.०० : पर्यंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज श्री संत तुकाराम महाराज मंदिर पंढरपुर मा. अध्यक्ष श्री तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू श्री देहू फडाधिकारी जिवन गौरव व वारकरी भुषण, वारकरीरत्न, श्री विठ्ठल वारकरी अशा अनेक पुरस्कार सन्मानीत ह.भ.प. श्री गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे किर्तन महाआरती महाप्रसाद तळवडे, श्री विठ्ठल रुक्मिणी कुळकार मंदिर कुंभारवाडी येथील मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.