नवी मुंबई येथे झालेल्या आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रांजली वाडेकर तिने मिळवले सुवर्णपदक

देवगड,दि .१० मे

दि. ४ मे २०२४ रोजी द्रोणाआर्चरी अकॅडमी ,पनवेल आयोजित 3rd द्रोणा कप २०२४ आर्चरी चॅम्पियनशिप पनवेल , नवी मुंबई येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील वाडातर गावची सिंधुकन्या कु. प्रांजली संजय वाडेकर हिने इंडियन या प्रकारात मुलींच्या खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल प्रांजलीचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे