मालवणात सेवांगणतर्फे संस्कार शिबिराचे आयोजन

मालवण,दि .१० मे

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने दि. १७ ते २१ मे या कालावधीत सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत साने गुरुजी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिरोळ येथील साथी बाबासाहेब नदाफ व सहकारी ऐरोबिक्स, योगा, कॅलेस्थिनिक्स, नृत्य, गाणी, गोष्टी, गटचर्चा, खेळ, पथनाट्य, लेझीम, झांज, दांडिया या विषयावर मार्गदर्शन, धमाल मस्ती आणि खेळ होणार आहेत. या शिबिरात १० ते २० या वयोगटातील प्रथम येणाऱ्या ४० मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. या शिबिरासाठी प्रवेश शुल्क असून इच्छुकांनी सेवांगण येथे नोंदवावीत, असे आवाहन अॅड. देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.