सावंतवाडी,दि.१९ जानेवारी
सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोती तलाव आहे. या मोती तलावामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. या तलावाच्या काठावर दिवसभर वर्दळ असते तर सायंकाळी नागरिक मोठ्या संख्येने विरंगुळा मिळावा म्हणून बसतात आणि फिरत असतात. या तलावाच्या काठावर पांढऱ्या बगळ्यांचे देखील वस्तीस्थान आहे. पाण कावळे,पाण मांजर देखील अधुन मधुन दिसतात. पर्यावरणीय दृष्ट्या मोती तलाव स्वच्छ असल्याने हे दर्शन घडते.
सकाळी आठ वाजता मोती तलाव मध्ये सुमारे तीन फुटी मगर दिसली तिचा हा व्हिडिओ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी टिपलेला आहे.या मगरीचा कोणाला त्रास कोणाला होणार नाही अशी खबरदारी नगरपरिषद घेईल.