तळेरे, दि.११ मे
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा (रजि.) शाखा कासार्डे कदमवाडी ता. कणकवली यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती महोत्सव मंगळवार दि. १४ मे २०२४ रोजी विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने स.१० वा धम्मध्वज वंदन, स.१०.१५ वा. बुद्ध पूजापाठ, दु.१२.३० वा.ते दु.२.३० वा पर्यंत भोजन,सायं-४.३० वा. मिरवणूक, सायं.७.३० वा. जाहीर सत्कार समारंभ सत्कारमूर्ती सभाध्यक्ष आयु. विजयी भि कदम,तसेच भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्गचे अध्यक्ष आयु. आनंद कासार्डेकर, पत्रकार आयु. दत्तात्रय मारकड यांची विशेष उपस्थिती राहणार असून याशिवाय कासार्डे गावचे माजी सरपंच आणि उद्योगपती आयु. संतोष पारकर, कासार्डे गावच्या विद्यमान सरपंच आयु. निशा नकाशे,उपसरपंच आयु.गणेश पाताडे, ग्रा.प. सदस्या आयु.श्रद्धा शेलार, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक आयु.संजय भोसले यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय रात्री १० वा. कलांकूर मालवण निर्मित ‘मराठी अस्मितेच्या पाऊलखुणा’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने अध्यक्ष विजय कदम यांनी केले आहे.