कणकवली दि.११ मे(भगवान लोके)
: प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ,कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा १५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
पहाटे ४.३० वाजता काकड आरती,
सकाळी ७.०० वाजता स्वामी समर्थांची नित्य पूजा,सकाळी ८.३० वाजता लघुरुद्र , महारुद्र, दुपारी १२.३० वाजता महाआरती, महाप्रसाद,
दुपारी३.३० वाजता गुरुचरित्र्य वाचन,
सायंकाळी ५.०० वाजता भजने,
सायंकाळी ७.०० वाजता हरिपाठ ८.०० वाजता किर्तन,रात्री १०.०० वाजता
स्थानिक कार्यक्रम होणार आहेत.
सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थ मठ कळसुली प्रथम वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे लाभ घ्यावा,असे आवाहन हनुमंत सावंत यांनी केले आहे.