नांदगाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जिओ नेटवर्क गायब

कणकवली दि .११ मे(भगवान लोके)

कणकवली तालुक्यातील नांदगाव हे मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा वसलेल्या गावात मोबाईल नेटवर्क वारंवार गायब होत आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाला की मोबाईल कव्हरेज क्षेत्राबाहेर लागतो, यामुळे नांदगाव विभागात जीओ ग्राहक हैराण झाले आहेत.

नांदगाव येथे सुरुवातीला बीएसएनएल ‌व एअरटेल अशी नेटवर्क असायची यातील बीएसएनएल नेटवर्क असेच गायब होत असल्याने काही वर्षांपूर्वी जीओ कंपनीने मोबाईल टॉवर उभारून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.लोकांनी सिमकार्ड पोर्ट करुन अथवा नव्याने जीओ नेटवर्कसाठी रुपांतर केले. आता तर गेल्या दोन महिन्यांपासून नांदगाव परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला की जीओ मोबाईल नेटवर्क गायब होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.