अवकाळी पावसाने सावंतवाडी मध्ये हजेरी

सावंतवाडी दि.११ मे 
गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्णता वाढल्याने जनता हैराण झाली आहे. आज संध्याकाळी सात वाजल्यापासून ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट करत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली.
सावंतवाडी तालुक्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे सर्वांची धावपळ उडाली. सावंतवाडी शहरातील फिरते विक्रेते, आंबा विक्रेत्यांनाही पळापळ करावी लागली.
अवकाळी पावसाने सर्वत्र झोडपून काढले