मालवण,दि.११ मे
देवळी समाज उन्नती मंडळ पेंडूर देऊळवाडी आणि देवळी समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी समाज दशावतार कलाकार सत्कार सोहळा दि. २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पेंडूर देऊळवाडी येथील श्री देवी सातेरी परिसर युवक संघटना रंगमंच (प्राथमिक शाळा पेंडूर क्र. १ नजीक) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून देवळी समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर व देवळी समाज पेंडूरचे अध्यक्ष शैलेश तेंडुलकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मालवण तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष रमेश नरसुले, जिल्हा सरचिटणीस रमेश पिंगुळकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणपत नाईक, प्रमुख मार्गदर्शक बाबी वेतोरकर व विलास तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त रात्री ९ वा. देवळी समाज कलाकार संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री देवी सातेरी परिसर युवक संघटना पेंडूर देऊळवाडी यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.