बाजारपेठेत गुरांना वाढते अपघात लक्षात घेऊन उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांनी दिले गुरांच्या गळ्यात बांधण्यासाठी रेडीयम बेल्ट

दोडामार्ग, दि. १९ जानेवारी

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात शहरात बाजारपेठेत मोकाट गुरांचा उपद्रव वाढत आहे. यात लहान वासरे तसेच मध्यम गुरांचा समावेश आहे. गुरांचे मालक आपल्या जनावारांची काळजी घेत नाहीत त्यामुळे दोडामार्ग बाजारपेठेत राञीच्या वेळी रस्त्यावर बसलेली गुरे वाहन धारकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गुरे वासरे यांच्या अंगावरून वाहन जाऊन गुरे जखमी होणे घटना वाढत आहेत. हे लक्षात घेऊन दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजग विवेकानंद नाईक यांनी गुरे वासरे राञीच्या वेळी वाहन धारकांच्या लक्षात रेडीयम बेल्ट उपलब्ध करून दिले ते समीर रेडकर इतरांनी गुरे पकडून त्यांच्या गळ्यात बांधणे मोहीम हाती घेतली आहे.
दोडामार्ग शहरात चारही रस्त्यावर तसेच बस स्थानक तहसीलदार कार्यालय बाजारपेठेत घोळका करून गुरे बसलेली असतात यात नुकत्याच जन्मलेल्या लहान वासरांचा मध्यम वयाची तसेच इतर वयोगटातील पाळीव गुरांचा समावेश आहे. नगरपंचायत यांनी गुरांच्या मालकांना नोटीस काढून देखील मालक गुरे घरी नेऊन बांधत नाहीत. यामुळे अनेक वाहनाच्या धडकेने लहान वासरे जखमी होऊन त्यांचे काही अवयव निकामी होत आहे. लहान वासरे तर वेदनेने तळमळत असतात हे पाहून अनेकांना गहिवरून येते
हे उद्योजक विवेकानंद नाईक यांनी लक्षात घेऊन गुरांच्या सुरक्षेसाठी रेडीयम बेल्ट गुरांच्या गळ्यात बांधून राञीच्या वेळी
वाहन धारकांना गुरे दिसली पाहिजे ही योजना अमलांत आणली.
सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विवेकानंद नाईक यांनी दिलेले रेडीयम बेल्ट गुरुवारी मध्यरात्री दोडामार्ग येथील

समीर रेडकर, सुमित म्हाडगुत, महेश मयेकर, स्वप्निल गवस,साजन गवस,विराज सावंत,सागर नाईक, रोहन खडपकर, विनायक खडपकर,शुभम मुळगावकर, निलेश पटकारे, लक्ष्मण खडपकर, यांनी काही गुरे पकडून बेल्ट बांधले तर मारायला येणाऱ्या गुरांना शक्य झाले नाही. अशा गुरांच्या गळ्यात रेडीयम बेल्ट बांधण्यासाठी गुरांच्या मालकांनी सहकार्य करावे असे आवाहन समीर रेडकर यांनी केले आहे. विवेकानंद नाईक हे दोडामार्ग शहरातील विविध सामाजिक उपक्रम नेहमीच पुढे असतात.