सावंतवाडी दि.१२ मे
उन्हाळ्यात जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहेत. या वणव्यात जैवविविधतेने नटलेल्या सौंदर्यांची हानी होते. जीवसृष्टीला धोका निर्माण होतो. वन्य प्राणी,पक्षी सैरावैरा पळतात. फळ बागायतींचे नुकसान होते. वणवे कधी कधी नकळत लागतात. जळती सिगारेट किंवा काढी टाकल्यास केरकचरा भरभरून जळत सुटतो तर काही वेळा जाणूनबुजून वणवे लावले जातात.
आंबोली थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून जागतिक पातळीवर ओळखलं जातं. पश्चिम घाटात आंबोलीच्या जंगलात विपुल प्रमाणात वन्य प्राणी,औषधी वनस्पती,साप, बेडुक असा मोठा खजिना आहे. त्यामुळे वणवे रोखणे आवश्यक आहेत.
आंबोली घाटात लागलेला वणवा विझवून टाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न जैवविविधता अभ्यासक,पत्रकार काका भिसे यांनी केला. त्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
जंगलातील वणवे जैवविविधता नष्ट करणारे ठरतात तर फळबागातील वणवे आर्थिक नुकसान करतात. प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे खंत, किटकनाशकांची किंमत देखील वाढली आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करून फळबागा जगविण्यासाठी प्रयत्न केला जातो. यातच वणवा लागला किंवा लावला तर फार मोठे नुकसान होते.
दरम्यान पर्यावरणप्रेमी, पत्रकार काका भिसे म्हणाले, आंबोली घाट जैवविविधता संवेदनशील क्षेत्र म्हणून जागतिक पातळीवर ओळखलं जातं. या ठिकाणी लागणारे वणवे वेळीच विझवून टाकले तर जैवविविधता नष्ट होण्यापासून वाचू शकते. वन विभागाचा टोल फ्री क्रमांक कधीच लागत नाही. त्यामुळे घाट रस्त्यावर फलक लावून वन विभाग कार्यालय,वनक्षेत्रपाल,वनपाल आदी नंबर दिले तर वणवे किंवा वन्य प्राण्यांची माहीती देणं सुलभ होईल. मी आंबोली ते सावंतवाडी असा नुकताच प्रवास करत असताना आंबोली घाटात वणवा पेटत होता,तो मी विझवून टाकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असे प्रयत्न प्रत्येक जागरूक नागरिकांनी केले पाहिजे.
Home आपलं सिंधुदुर्ग आंबोलीच्या जंगलात विपुल प्रमाणात वन्य प्राणी,त्यामुळे वणवे रोखणे आवश्यक-पत्रकार काका भिसे