कणकवली दि.१२ मे(भगवान लोके)
: तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र राज्य ओपन क्यूरोगी व पुमसे निमंत्रित तायक्वांदो स्पर्धा राॅयल बॅक्यूट हाॅल,रत्नागिरी येथे झाली. या स्पर्धेत कणकवली तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभागी होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
स्पृहा राणे हिने सबज्युनिअर गटा मध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच मुलांमध्ये ऋन्मय शिरवलकर याने कास्य पदक पटकावले आहे. ज्युनिअर गटामध्ये दुर्वा गावडे आणि ऋतुजा शिरवलकर यांनी कास्य पदक पटकावले. या स्पर्धेमध्ये आराध्या सबनीस, श्रुती गाडेकर, श्रुष्टी परीट, वेद खाडये,शिवांग पेडणेकर, प्रेसित कामत, ओंकार पाटील, लौकिक मुंडले, प्रणव कुडाळकर, अथर्व तेली या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे, तसेच सर्व पालक यांनी अभिनंदन केले.