वीस तास विजेअभावी राज्य सरकार महावितरण अधिकारी यांच्या कारभारामुळे जनतेवर ही वेळ

जरा पाऊस वारा झाला ही वेळ पावसाळ्यात काय? अनेकांचे मोबाईल बंद

दोडामार्ग, दि.१२ मे 

दोडामार्ग तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा पाऊस यांनी झोडपून काढले. काही मिनिटे झालेल्या या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील बत्ती गुल झाली जवळपास वीस तास दोडामार्ग तालुक्यातील जनतेला वीजे अभावी काढावे लागले. दोडामार्ग तालुक्यात या अगोदर महालक्ष्मी विज निमिर्ती केंद्र कोनाळकट्टा येथून तिलारी प्रकल्पाची वीज पुरवली जात होती. पण राज्य सरकार महावितरण अधिकारी यांनी पुन्हा करार केला नाही. आणि याचा फटका हा दोडामार्ग तालुक्यातील जनतेला सोसावा लागत आहे.
इंन्सूली येथून वीज पुरवठा खंडीत झाला असे सांगण्यात आले. राज्य सरकार महावितरण अधिकारी यांच्या बेजबाबदार पणामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनतेवर ही वेळ आली तरी सत्ताधारी मंडळी मृग गिळून गप्प आहेत. कुणी महावितरण
अधिकारी यांना जाब विचारत नाही. काही मिनिटे अवकाळी पावसाने झोडपून काढले तर दोडामार्ग तालुक्यातील जनतेवर ही वेळ तर पुढे पावसाळ्यात काय अवस्था असेल. असा सवाल उपस्थित केला जात आहे. वीस तास वीज पुरवठा बंद राहिल्याने अनेकांचे मोबाईल बंद पडले. उद्योग व्यवसाय यांना फटका बसला.