दोन दिवसापासून बेपत्ता असलेले ग्रामपंचायतचे सदस्य महेश शिरसाट कुडाळ येथील त्यांच्या नातेवाईकांच्या दुकानात आढळले.

सावंतवाडी दि.१२ मे 
गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेले मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतचे सदस्य महेश रंगनाथ शिरसाट अखेर कुडाळ येथील त्यांच्या नातेवाईकांच्या दुकानात आढळून आले. त्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

महेश शिरसाट हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाले होते. बेपत्ता झाल्यासंदर्भात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांची पत्नी श्रद्धा शिरसाट यांनी तक्रार दाखल केली होती. पोलीस आणि नातेवाईक महेश शिरसाट यांचा शोध घेत होते. त्यानंतर शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास कुडाळ येथील ते आपल्या नातेवाईकांच्या दुकानात दाखल झाल्यावर नातेवाईकांनी त्याला आपल्या ताब्यात ठेवत घरच्यांना संपर्क केला. त्यानंतर घरच्यांनी कुडाळला जात त्यांना ताब्यात घेतले. मात्र ते नेमके कोणत्या कारणासाठी बाहेर होते त्याची माहिती मात्र मिळू शकली नाही.