राणी पार्वती देवी हायस्कूलच्या १० वी च्या १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

सावंतवाडी दि.१२ मे
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या १० वी च्या १९९६-९७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन सावंतवाडी येथे संपन्न झाले.
यावेळी मोठ्या संखेने १० वीचे माजी विद्यार्थी उपस्थीत होते . वर्षातून एकदा जमा होणाऱ्या मित्र मंडळी यांच्या सहकार्यातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यावेळी काही गरजवंत सहकाऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.