मालवण,दि.१२ मे
मालवण सोमवार पेठ येथील श्री देवी भैरवी देवालयाचा १५ वा वर्धापन दिन सोहळा २० मे रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता अष्टपैलू कलानिकेतन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता श्री लिंग रवळनाथ भजन मंडळ पोखरण कुडाळ यांचे संगीत भजन बुवा समीर कदम, रात्री १० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी यांचे पौराणिक दशावतारी नाटक ‘चंद्रसेन मालिनी’ सादर होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.