वराड येथे २४ रोजी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

मालवण,दि.१२ मे

वराड बौद्ध विकास मंडळ, मुंबई गाव शाखा वराड यांच्यावतीने दि. २४ मे रोजी आंबेडकरनगर वराड येथे खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ५५५० रुपये, ३५०० रुपये, २५०० रुपये तर उत्तेजनार्थ क्रमांकासाठी १५०० रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी योगेश वराडकर (८८७९९०७३३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.