शिंदे गटाची आता नितेश राणेंनी लायकी काढली,उद्या भाजप काढेल

ठाकरे सेनेच्या आ. वैभव नाईक यांची टीका

कणकवली दि.१९ जानेवारी(भगवान लोके)

महायुतीचा मेळावा दोन तीन दिवसापुर्वी झाला आणि त्या संदर्भात महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात कुरकुर सुरु होती. आणि काल नितेश राणेंनी जी शिंदे गटाची जी लायकी काढली ती योग्यच पध्दतीने काढलेली आहे. पहिल्यांदाच नितेश राणे खरं बोल्ले की , ह्यांची लायकी काय आहे ती…! आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे गटातील जे कार्यकर्ते आहेत .त्यांची लायकी ही आहे की विकासासाठी निधी द्यायचा नाही फक्त पैशाची आमिष द्यायची . आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न करायचा .शिंदे गटाची आता नितेश राणेंनी लायकी काढली,उद्या भाजप काढेल,अशी टीका ठाकरे सेनेच्या आ. वैभव नाईक यांनी केली.

गेल्या २ वर्षातुन शिंदे गटातुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालु आहे.त्यात लोकांना पैशांची आणि ठेकेदारीची आमिष दाखवायची आणि कुठलच काम करायच नाही .आणि येणा-या काळातुन तरी त्यांनी यातुन सुधराव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही प्रलोबनाची आमिष न देता विकासासाठी कुठेतरी सहकार्य करावे. आज आमदारांनी तुमची लायकी काढली नायतर उद्या लोक तुमची लायकी काढतील. त्यामुळे तुम्ही अजुनही सुधारा आणि विकास कामासाठी काय करता येईल हे बघा . संजय आग्रे व नितेश राणे हे काही वर्षापूर्वी एकमेकांना पाण्यात बघत होते. आणि आज नाईलाजाने एकमेकांना व्यासपीठावर बसाव राहाव लागत आहे. त्यामुळे ही युती पण जास्त दिवस टिकणार नाय आणि लोकांना पण आवडणार नाही . महायुती ही शिवसेनेला संपवण्यासाठी चाललेली आहे. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादी असुदेत काही किंमत देत नाहीत. फक्त येणा-या काळामध्ये शिवसेनेची मत खेचण्यासाठी हा प्रयत्न करत होते. परंतु उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते व सामान्य जनता त्यांच्या सोबत आहे. त्याचा कुठलाही फरक पडला नाही. हे सगळ्यांनाच लक्षात आलंय त्यामुळे लोकसभा निवडणूक झाली की लोकं यांची लायकी काढून यांना सत्तेतुन बाहेर काढणार असल्याचा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.