रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संपर्क साधून लक्ष वेधले-माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी,दि.१९ जानेवारी
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस बाबत होणारें आंदोलन प्रश्नावर घोषणाबाजी करणार नाही तर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना संपर्क साधून लक्ष वेधले आहे अशी माहिती माजी आमदार राजन तेली यांनी दिली

सावंतवाडी टर्मिनस तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकातील थांबे याबाबत २६ जानेवारी रोजी प्रवासी संघटनेच्या माध्यमातून होत असलेले आंदोलन खरे तर त्यांना करावे लागू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यांच्या मागण्या रास्त असून आपण याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब यांच्याशी बोललो आहे. लवकरच याबाबत आपण प्रत्यक्ष भेट घेणार असून हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे राजन तेली यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,अजय गोंदावळे, मनोज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत ओ तेली यांनी सांगितले.