वाफोली माऊली मंदिर येथे 22 रोजी विविध कार्यक्रम

बांदा, दि१९ जानेवारी
अयोध्या येथे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ८ वाजता सर्व देवी देवतांची विधिवत पूजा, रामरक्षा याग १०८ वेळा श्री राम जय राम जय जय राम हा नाम जप, श्री रामरक्षा स्रोताचे पारायण, मारुती स्रोताचे पठण, सकाळी ११ वा. रोहन बुवा पुराणिक (परुळे ता.कुडाळ) यांचे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवनावर कीर्तन, दुपारी १२ वा. आरती व सामुदायिक गाऱ्हाणे, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी दीपोत्सव, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने आदी कार्यक्रम होणार.तरी वाफोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भजन रसिकानी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती,वाफोली प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था,मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.